ध्येयासाठी प्रयत्न करण्यात समाधान असते. ध्येय गाठण्यात नव्हे.
चलन (Variation)
इयत्ता आठवी प्रकरण 7 चलन |variation |chlan |मध्ये एक राशी दुसऱ्या राशीवर अवलंबून कशाप्रकारे असते याचा अभ्यास केला जातो.समचलन (Direct Variation ) व व्यस्त चलन (Indirect Variation ) असे दोन प्रमुख प्रकार आहेत.समचलनाबद्दल माहिती घेऊ.
समचलन / समप्रमाण (Direct Variation):
जेव्हा x हे चल y या चलावर अशा रीतीने अवलंबून असते की x/y = k (k स्थिरपद ), तेव्हा x आणि y समप्रमाणात /समचलनात आहेत असे म्हणतात.
x आणि y या राशी समप्रमाणात / समचलनात असताना :
1) जर x च्या किंमतीमध्ये वाढ झाली तर y च्या किंमतीत त्याच प्रमाणात वाढ होते.
2) जर x च्या किंमतीमध्ये घट झाली तर y च्या किंमतीत त्याच प्रमाणात घट होते.
महत्वाचे मुद्दे :
1) x आणि y यांच्यामध्ये सम चलन आहे हे चिन्हात x ∝ y असे लिहितात.
चलनाचे विधान : x ∝ y
2) x ∝ y हे समीकरणाच्या रूपात x =k y किंवा x/y= k असे लिहितात. येथे k हे स्थिरपद आहे.
3) जर x ∝ y तर x/y= k असते.
जर x/y= k तर x ∝ y असते.
4) चलनाचे समीकरण : x/y = k किंवा x = k y
k हा चलनाचा स्थिरांक आहे.
5) समचलनात संगतमूल्यांचे गुणोत्तर स्थिर असते.
x1/y1 = x2/y2 = k (k स्थिरपद)
6) सम चलन असणारी काही उदाहरणे:
1) वस्तूंची किंमत ( p) व वस्तूंची संख्या (n) यांमध्ये समचलन असते.
चलनाचे विधान : p ∝ n
चलनाचे समीकरण : p/n = k (k स्थिरपद)
2) वर्तुळाचा परीघ ( c ) व वर्तुळाची त्रिज्या ( r ) यांमध्ये समचलन असते.
वर्तुळाचा परीघ ( c ) त्रिज्येशी ( r ) समप्रमाणात असतो.
चलनाचे विधान : c ∝ r
चलनाचे समीकरण : c/r = k (k स्थिरपद)
3) वर्तुळाचे क्षेत्रफळ (A) त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी (r²) समप्रमाणात असते.
चलनाचे विधान : A ∝ r²
चलनाचे समीकरण : A/r²= k (k स्थिरपद)
चलन घटकावरील उदाहरणे सोडविण्यासाठी कृती :
1)उदाहरणातील माहितीनुसार प्रथम चलनाचे विधान लिहा.चलनाचे विधान दिलेले नसल्यास सारणीतील संगतमूल्यांचे गुणोत्तर स्थिर येत असेल तर समचलनाचे विधान लिहा.
2)चलनाच्या विधानावरून समीकरण लिहा.
3) x व y च्या संगत मूल्यांवरून (किमतींवरून ) चलनाचा स्थिरांक (k) काढा.
4) चलनाच्या स्थिरांकाची (k ची) किंमत समीकरणात लिहून चलनाचे समीकरण लिहा.
5) चलनाच्या समीकरणात दिलेली एकाचलाची (राशीची ) किंमत ठेवा व दुसऱ्या चलाची (राशीची ) किंमत काढा.
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] तांदळाची किंमत (p) त्याच्या वजनाच्या (w) समचलनात असते. हे विधान चलनाचे चिन्ह वापरून कसे लिहिता येईल?
1) p ∝ 1/w 2) p ×w = k
3) p/w = k 4) p ∝ w
उत्तर : (4)
2] पुढील सारणीवरून x ची किंमत काढा.
1) 1/5 2) 11 3) 5 4) 72
उत्तर : (2)
सारणीतील निरीक्षणावरून
a/b = 12/60 = 1/5
a/b = 15/75 = 1/5
a/b = 22/110 = 1/5
a/b = 1/5
a = x, b = 55 ठेवू
x / 55 = 1/5
x = 1/5 × 55
x = 11
दुसरी पद्धत :
1) चलनाचे विधान दिलेले नाही. सारणीतील संगत मूल्यांचे गुणोत्तर काढू.
a/b = 12/60 = 1/5
= 15/75 = 1/5
= 22 /110 = 1/5
सारणीतील संगत मूल्यांचे गुणोत्तर स्थिर येते.
a/b = k
∴ a ∝ b
2) a/ b = k
3) 12/60 = k
1 / 5 = k
चलनाचा स्थिरांक (k) = 1/5
4) a/b = 1/5 ...... चलनाचे समीकरण
5) जेव्हा b= 55 तेव्हा a=?
a/b = 1/5 ...... चलनाचे समीकरण
a/55 = 1/5
a = 1/5 × 55
a = 11
3] x आणि y या राशी समप्रमाणात आहेत. जर x च्या किंमतीमध्ये वाढ झाली, तर y च्या किंमतीत किती फरक पडेल? (2009-10)
1) त्याच प्रमाणात घट होईल.
2) फरक पडणार नाही.
3) त्याच प्रमाणात वाढ होईल.
4) दुप्पट वाढ होईल.
उत्तर : (3)
x आणि y या राशी समप्रमाणात / समचलनात असताना :
1) जर x च्या किंमतीमध्ये वाढ झाली तर y च्या किंमतीत त्याच प्रमाणात वाढ होते.
खालील उदाहरणाचे उत्तर टिप्पणी मध्ये एंटर करा. उत्तराचा क्रमांक लिहा.
चलनाचे चिन्ह वापरून लिहा.
y हे x च्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते.
आजचा प्रश्न
E = mc² हे समीकरण कोणी मांडले?
उत्तर 👇
General Knowledge - आजचा प्रश्न
✍️ आणि हा लेख उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.
लेखक: Ganit Expert Hovuya
श्री.जे.एम.पाटील
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:8329467192
📱 WhatsApp: 9405559874
📌 स्पर्धा परीक्षांसाठी गणित मार्गदर्शन
अजून अशाच उपयुक्त माहितीकरिता भेट द्या
https://ganitexperthovuya.blogspot.com


4
Anonymous | January 30, 2023 at 9:51 PM